समलैंगिक महिलांचे (लेस्बियन) ध्वज हे असे ध्वज आहेत जे समलैंगिक (लेस्बियन) स्त्रियांद्वारे किंवा त्यांचा समर्थकांद्वारे वापरले जातात. लेस्बियन ध्वजाचा वापर हा स्वतःची समलैंगिक म्हणून ओळख व्यक्त करण्याचा आणि स्वतःच्या विचारांना अनुमोदन देण्याचे एक प्रतीकात्मक चिन्ह आहे. अनेक लेस्बियन ध्वज तयार केले गेले आहेत, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे दुधारी कुऱ्हाडीचा (परशूचा) ध्वज, लिपस्टिक ध्वज, गुलाबी ध्वज, सूर्यास्तवर्णी ध्वज, ज्यापैकी शेवटचा ध्वज वापरणारी व्यक्ती स्वतःला लेस्बियन म्हणून ओळखू शकते किंवा नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समलैंगिक महिलांचे ध्वज
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.