सन मराठी ही सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीचे मराठी भाषेतील मोफत प्रसारण असणारी दूरचित्रवाणी वाहिनी आहे. या वाहिनीचे प्रथम प्रसारण १७ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले. सन मराठी ही सन समूहाची बिगरदक्षिण भारतीय बाजारपेठेतील दुसरी आणि पश्चिम भारतीय बाजारपेठेतील पहिली वाहिनी आहे. या वाहिनीचे घोषवाक्य "सोहळा नात्यांचा" असे आहे. महिन्यांच्या प्रत्येक रविवारी सन मराठी महाएपिसोड प्रसारित केले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सन मराठी
या विषयावर तज्ञ बना.