सत्यपाल चिंचोलीकर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सत्यपाल चिंचोलीकर उर्फ सत्यपाल महाराज ( १६ मे, १९५२) हे महाराष्ट्रातील एक समाज प्रबोधक कीर्तनकार आहेत. सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर हातात झाडू घेत स्वच्छता करून आणि हातात खंजिरी घेत कीर्तनातून महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील गावांत समाज प्रबोधन करत असतात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरूकता पसरवली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →