खंजिरी हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक छोटेसे चर्मवाद्य आहे.
गाताना ठेका धरण्यासाठी व रंजकता आणण्यासाठी हे वाद्य वापरले जाते. लाकडी किंवा धातूच्या वर्तुळाकार पट्टीमध्ये ठराविक अंतरावर धातूच्या पातळ गोलाकार चकत्या बसवलेल्या असतात. या चकत्या एकमेकांवर आपटून नाद निर्माण होतो. खंजिरी एका हातात धरून दुसऱ्या हाताने आघात करून वाजवली जाते. लोकसंगीतात खंजिरीचा नियमित वापर होतो.
खंजिरी हे वाद्य तुकडोजी महाराज त्यांच्या भजनांत वाजवीत असत. सत्यपाल चिंचोलीकर हे सप्तखंजिरीच्या माध्यमातून कीर्तने करतात. त्यांनी खंजिरीला विकसित करून सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली.
खंजिरी
या विषयावर तज्ञ बना.