सत्य रानी चड्ढा (सुमारे १९३३ - १ जुलै, २०१४) या एक महिला हक्क कार्यकर्त्या होत्या. १९८० च्या दशकात सहकारी कार्यकर्त्या शहजहान आपा यांच्यासह भारतात हुंडा विरोधी चळवळ सुरू करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. या दोन्ही महिलांच्या मुलींचा हुंड्याच्या वादातून बळी गेला होता. आपल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आणि भारतातील हुंडा प्रथेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक दशके मोहीम राबवली. कायद्यापुढे हार मानण्याऐवजी, सत्या राणीने आपल्या मुलीच्या मृत्यूला एका चळवळीचे स्वरूप दिले. त्यांनी न्यायालयांना भेटी देणे, रस्त्यावर उतरून निदर्शने करणे आणि संसदेबाहेर आवाज उठवणे सुरूच ठेवले.
दोघांनी मिळून १९८७ मध्ये दिल्लीत 'शक्ती शालिनी' या संस्थेची स्थापना केली, जी पीडित महिलांना आश्रय देण्याचे आणि हुंडाबळी तसेच लिंगाधारित हिंसेविरुद्ध लढण्याचे काम करते. चड्ढा यांना नीरजा भनोत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सत्य राणी चड्ढा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?