संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे समर्थक आणि विरोधक

या विषयावर तज्ञ बना.

fसंयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे आणि चळवळीचे श्रेय मागण्यात काहिशी अहमहिका झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे समर्थकांचे एक वर्गीकरण आग्रही आणि दुसरे नेमस्त. दुसरे वर्गीकरण साहित्यिक आणि राजकारणी, तर तिसरे संघटना आणि व्यक्ति.

अमराठी भाषिकराज्यांशी जोडले जाण्याची अस्वस्थता तत्कालीन मध्यप्रांत आणि बेरार प्रांतातील विदर्भीय नेत्यांनी सर्व प्रथम व्यक्त करण्यास सुरुवात केल्याचा वऱ्हाडातील नेत्यांचा दावा असतो. भाषावार प्रांतरचनेचे समर्थन केल्याचे श्रेय टिळक संप्रदायी मागतात.

१९१७ मधील 'थ्री डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र' या लेखात मराठी लोक हे मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ, हैदराबाद व गोवा येथे पसरले आहेत, त्या सर्वांचा मिळून महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे असे प्रतिपादन श्री. विठ्ठल वामन ताम्हणकरांनी केले. श्री. जनार्दन विनायक ओक यांना या लेखाचे महत्त्व खूप पटले व त्यांनी त्यांच्या 'लोकशिक्षण'मधून याचा वेळोवेळी पाठपुरावा करावयास सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →