संधारित्र

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

संधारित्र किंवा विद्युत संग्राहक (इंग्लिश:कॅपेसिटर) विद्युत उर्जा साठविणारे उपकरण आहे. यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक संवाहक पट्टांच्या संचांनी बनलेला एक घटक असतो, ज्यामध्ये एक पातळ निरोधक असताे आणि या संचाला सिरॅमिक किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवलेले असते. अशी याची सर्वसाधारण संरचना असते. याचे साधे उदाहरण म्हणजे समांतर-पट्ट संधारित्र. संधारित्राच्या एका पट्टावर संपूर्ण धन भार (+Q) संचयित असेल, तर तेवढ्याच प्रमाणात ऋण भार (-Q) दुसऱ्या पट्टावर असतो. त्यामुळे संधारित्राला भार (Q) आहे असे म्हणण्यात येते.

कॅपेसिटरचा प्रभाव कपॅसिटीन्स म्हणून ओळखला जातो. सर्किटमध्ये जवळपास असलेल्या दोन विद्युत वाहकांमधील काही कॅपेसिटन्स अस्तित्वात असताना, एक कॅपेसिटर हा एक घटक आहे जो सर्किटमध्ये कॅपेसिटन्स जोडण्यासाठी डिझाइन केलेला असतो. कॅपेसिटर मूळतः कंडेनसर किंवा कंडेन्सेटर म्हणून ओळखला जात असे

संधारित्राचे अनेक उपयोजन आहेत. उदा., संगणकाच्या स्मृतीमध्ये साठविलेली माहिती विद्युत प्रवाहात खंड पडल्यास गमवावी लागू नये म्हणून संगणकाच्या अंकीय मंडलावर संधारित्राचा वापर करण्यात येतो. विद्युत प्रवाहाच्या खंडतेमुळे ही माहिती संधारित्रावर विद्युत ऊर्जेच्या स्वरूपात असते. तसेच बनावट विद्युत संकेत वळवण्यासाठी गाळण म्हणून संधारित्र अधिक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यामुळे संवेदनशील घटक आणि विद्युत लाटामुळे होणारे विद्युत मंडलाचे नुकसान टाळता येते.

संधारित्राचा आणखी एक सामान्य प्रकार म्हणजे विद्युत अपघटनी संधारित्र (Electrolyte capacitor) आहे, जो लहान पाकीटामध्ये उच्च धारिता संधारित्र आहे.

संगणकातील इतर घटकांप्रमाणे, संधारित्र अयशस्वी होऊ शकतात आणि जेव्हा ते संगणकात अयशस्वी होतात तेव्हा ते इतर घटकांना अयशस्वी होण्यास कारणीभूत ठरतात. मदरबोर्डावरील संधारित्र अयशस्वी होतात तेव‌्‌हा संगणक सुरू करता येत नाही. या परिस्थितीत एकतर संधारित्र बदलणे आवश्यक असते किंवा संगणकात नवीन मदरबोर्ड ठेवणे आवश्यक असते.

संधारित्राचे मानक एकक फॅराडे (F) आहे.



1 µF =10-6F (µF = मायक्रो फॅराडे)

1 pF = 10-12 F (pF = पिकोफॅराडे)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →