संदीप शर्मा (जन्म १८ मे १९९३) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे, जो चंदिगढसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे. शर्माने २०१० आणि २०१२ या दोन १९ वर्षांखालील विश्वचषकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. १९-वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१२ चेविजेते म्हणून उदयास आलेल्या १९-वर्षाखालील भारतीय संघाचा तो प्रमुख सदस्य होता. ह्या विश्वचषकात त्याच्या गोलंदाजीच्या कामगिरीनंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने २०१३ मध्ये करारबद्ध केले. त्याला यॉर्कर गोलंदाजी आणि चेंडू स्विंग करण्याच्या त्याच्या क्षमतेसाठी खूप प्रतिष्ठा मिळाली. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीची अनेकदा भारताचा माजी गोलंदाज प्रवीण कुमारशी तुलना केली जाते. संदीप शर्माने आयपीएलमध्ये वर्षभरात गोलंदाज म्हणून सातत्य आणि परिणामकारकता दाखवली आहे आणि त्याची कामगिरी चांगली असूनही अनेकदा त्याला कमी दर्जाचे मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संदीप शर्मा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.