षा'न्शी

या विषयातील रहस्ये उलगडा.

षा'न्शी

षा'न्शी (नवी चिनी चित्रलिपी: 陕西; जुनी चिनी चित्रलिपी: 陕西; फीनयीन: Shǎnxī; उच्चार: षान्-शीऽऽऽ; अर्थ: पश्चिम षानचौ) हा उत्तर-मध्य चीनमधील प्रांत आहे. याच्याजवळच याच नावाशी साधर्म्य असलेला, मात्र नावाचा निराळा स्वरोक्त उच्चार असलेला षान्शी नावाचा वेगळा प्रांत आहे. षा'न्शीच्या ईशान्येस षान्शी, पूर्वेस हनान, आग्नेयेस हूपै, दक्षिणेस चोंगछिंग महानगरपालिका, नैऋत्येस सच्वान, पश्चिमेस कान्सू, वायव्येस निंग्श्या व उत्तरेस आंतरिक मंगोलिया हे चिनी प्रांत वसले आहेत. शीआन येथे षा'न्शीची राजधानी आहे.

जानेवारी २०, इ.स. १५५६ला येथे झालेल्या भूंकपात अंदाजे ८,३०,००० व्यक्ती मरण पावल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →