श्वास (चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

श्वास (चित्रपट)

श्वास हा २००४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. याचे चित्रण सिंधुदुर्ग, कोकण, पुणे आणि मुंबईतील 'केईएम' या रुग्णालयात ३० दिवसांमध्ये झाले आहे. श्वासला मराठी सिनेमामध्ये लक्षणीय वळण आणण्यासाठी ओळखले जाते.हिंदि, बंगाली, तमिळ भाषांमध्येहि हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →