अॅडव्होकेट श्रीहरी माधव अणे हे महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता होत. त्यांची या पदावर नियुक्ती ऑक्टोबर, २०१५ रोजी झाली होती.
त्याआधी हे पद अरविंद बोबडे, व्ही.आर. मनोहर व सुनील मनोहर आदी वैदर्भीय व्यक्तींनी भूषवले होते, त्यानंतरसुद्धा राहुल देव या वैदर्भीय व्यक्तीनेच भुषविले.
श्रीहरी अणे हे लोकनायक बापूजी अणे यांचे नातू आहेत. श्रीहरींचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण आताच्या झारखंडमधील जमशेटपूरला झाले. मुंबई व पुण्यात वकिली व्यवसायात उत्तम संधी असतानासुद्धा, त्यांच्यावर असलेल्या आजोबांच्या प्रभावामुळे त्यांनी नागपूर गाठले. नागपुरातल्या गांधीनगरातील एका मोटारीच्या गॅरेजमध्ये राहून त्यांनी वकिली सुरू केली.
स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ सुरू करण्यात लोकनायक अणे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे श्रीहरी अणेही कट्टर विदर्भवादी बनले.
विधि व पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणे अॅडव्होकेट श्रीहरी अण्यांना मनापासून आवडते. राज्य विधि आयोगाचे सदस्य, गांधी सेवा आश्रम समितीचे पदाधिकारी, अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केले आहे.
नागपूर खंडपीठातील ज्येष्ठ वकील के.एच. देशपांडे व कॉ. एस.के. संन्याल यांचा प्रभाव आपल्यावर आहे व त्यांच्यामुळेच माझी सामाजिक जाण तीव्र राहिली, असे अणे आवर्जून सांगतात. महाधिवक्ता या पदावर नियुक्ती होण्याआधीसुद्धा ते राज्य सरकारचे विशेष वकील म्हणून काम करीतच होते.
महाराष्ट्रावर देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ते सरकार अल्पमतात असल्याचा दावा करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली, तेव्हा अणेंनीच सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली व त्यावरून कोर्टाने ही याचिका फेटाळली.
सुमारे १४ वर्षे नागपूर खंडपीठात यशस्वीपणे वकिली केल्यानंतर अणे मुंबई येथे स्थायिक झाले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते कायदेशीर गुरू व त्यांनीच फडणवीस यांना वकीलीची धडे दिले.
श्रीहरी अणे यांनी विदर्भासोबत मराठवाडाही वेगळा करायला हवा, असे वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली, आणि स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून त्यांनी २२ मार्च २०१६ रोजी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिला.
श्रीहरी अणे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.