ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २००५ मध्ये श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौरा दोन भागात विभागला गेला होता कारण एकदिवसीय मालिका (२५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर) आणि डिसेंबरमधील कसोटी मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदिवसीय मालिकेसाठी भारतात आला होता. एकदिवसीय मालिकेआधी भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सातव्या स्थानी होता, आणि श्रीलंकेचा संघ दुसऱ्या. त्याशिवाय भारतीय संघाचे नेतृत्व सौरव गांगुलीकडून औपचारिकरित्या राहुल द्रविडकडे देण्यात आले होते. भारतीय संघाने पहिले चार एकदिवसीय सामन्यांसह मालिकेत ६-१ असा विजय मिळवला. पहिल्या सहा एकदिवसीय सामन्यांत फक्त ८६ धावा करू शकलेल्या, सनत जयसुर्याला श्रीलंकेच्या कसोटी संघातून वगळण्यात आले.. एकदिवसीय सामन्यांमध्ये २ वेळा नाबाद राहुन ३१२ धावा केल्या नंतर एकदिवसीय क्रमवारीत राहुल द्रविड १८ स्थाने वर चढला भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोणीची कामगिरीसुद्धा लक्षणीय झाली, मालिकेत त्याची सरासरी दुसरी सर्वात जास्त होती. एका सामन्यानत त्याने नाबाद १८३ धावा केल्या, जी त्यावेळी एकदिवसीय क्रिकेटमधील सहावी सर्वोच्च धावसंख्या होती.
कसोटी मालिकासुद्धा भारताने २-० अशी जिंकली, ज्यापैकी पहिल्या कसोटी मालिकेत पावसामुळे फक्त साडेतीन दिवसांचा खेळ शक्य झाला होता. दुसऱ्या कसोटीत अनिल कुंबळेने ७२ धावांत ६ गडी बाद केल्याने, भारताला ६० धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ४ फलंदाजांनी केलेल्या अर्धशतकांच्या (इरफान पठाण (९३), युवराज सिंग (७७), राहुल द्रविड (५३) आणि महेंद्रसिंग धोणी (५१*)) जोरावर भारताला ३७५ धावांवर डाव घोषित करता आला. त्यानंतर कुंबळेने सामन्यात १० बळी पूर्ण केले आणि श्रीलंकेचा संघ २४७ धावांवर बाद होऊन १८८ धावांनी पराभूत झाला. तिसऱ्या कसोटीतील विजय आणखी ठोस होता, कुंबळेने ७ आणि हरभजन सिंगने १० बळी घेऊन श्रीलंकेचा डाव २०६ आणि २४९ धावांवर संपवण्यास हातभार लावला आणि श्रीलंका २५९ धावांनी पराभूत झाली.
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.