प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे (जन्म : साहूर-अमरावती जिल्हा, ५ ऑक्टोबर १९३५; - नागपूर, २७ ऑक्टोबर २०१३]] हे महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातले एक मराठी कवी होते. त्यांचा जन्म श्रीमंत घराण्यात झाला होता. घरी भरपूर शेतीवाडा, वाडा वगैरे होता. शनवारेंचे वडील बंधू ना.कृ. शनवारे हे नागपूरचया धरमपेठ काॅलेजात मराठीचे प्राध्यापक तर पत्नी - कवितावहिनी -नागपूरच्याच एस.एफ.एस. (St Francis De Sales) काॅलेजात हिंदीच्या प्राध्यापिका होत्या.
त्यांच्या शिक्षणकाळात त्यांना भारत सरकारची १२००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती.
ते एम.ए., पीएच.डी. होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले. १९९६ साली दर्यापूरला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
प्रा. अजय कृष्णराव चिकाटे यांनी, श्रीधर शनवारे ह्यांच्या ’थांग-अथांग या काव्यसंग्रहाचा चिकित्सक अभ्यास’ हा लघु-शोधनिंबध लिहून एम.फिल. मिळवली आहे.(२००८)
‘कविवर्य श्रीधर शनवारे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर प्राध्यापिका रोहिणी कळमकर यांना नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली आहे.(१९९८)
प्रा. राष्ट्रपाल इस्तारी मेश्राम यांनी ‘झंझावात आणि थांग-अथांग: तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर लघु-शोधप्रबंध सादर करून एम.फिल. मिळविली आहे.(२००४)
प्रा. नरेंद्र बोडके यांनी श्रीधर शनवारे यांचा काव्यावर ‘गहिवरलेला महाशब्द’ हा समीक्षाग्रंथ लिहिला आहे (२००२).
शनवारे यांच्या कवितांची इंग्रजी, गुजराती, उर्दू व हिंदी या भाषांतून कवितांची भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत.
शनवारे यांच्या ’आतून बंद बेट’ या कवितासंग्रहाचा नागपूर विद्यापीठाच्या एम.ए. (मराठी)च्या अभ्यासक्रमात समावेश (१९८२, १९८३, १९८४)
त्यांना मिळालेली ५०हजार रुपयांच्या पुरस्काराची रक्कम त्यांनी अरुणा साबणे यांच्या ’माहेर' या संस्थेला दिली होती. त्यांच्या औदार्याचे असे बरेच दाखले आहेत.
श्रीधर कृष्ण शनवारे
या विषयावर तज्ञ बना.