श्रीअरबिंदो सर्कल - (प्रकाशनाचा आरंभ - १९४५, अखेर - १९९८)
१९४५ मध्ये मुंबईमध्ये श्री अरबिंदो सर्कल या नियतकालिकाच्या प्रकाशनास सुरुवात झाली. श्रीमाताजी यांचे आशीर्वाद या नियतकालिकास लाभले होते. त्यांनीच श्री अरबिंदो सर्कल हे नाव सुचविले होते. श्रीअरविंद आश्रमातील ज्येष्ठ सदस्यांचे आणि साधकांचे सर्व विषयांवर दुर्मिळ लेख यामध्ये प्रकाशित होत असत. १९९८ मध्ये त्याचे प्रकाशन बंद करण्यात आले. हे नियतकालिक वार्षिक होते.
के.डी.सेठना ऊर्फ अमल किरण हे या नियतकालिकाचे संपादक होते.
श्रीअरबिंदो सर्कल (नियतकालिक)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.