पोर्ट ब्लेर भारताच्या अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र आहे.
येथे भारतीय नौदलाचा तळ आहे.
येथे ब्रिटिश कालीन सेल्युलर जेल आहे. जेथे स्वातंत्र्य सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना येथेच काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवले होते. तसेच हजारो इतर स्वातंत्र्यसैनिकांसाठी ही भयावह जागा होती. आता येथिल सेल्युलर जेल मध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच १९४४ मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने हे बेट जिंकले होते व त्याचे नामकरण शहीद असे केले होते. बंगालच्या उपसागराच्या या पाणलोटात अनंत सरोवर सापडतील, ज्यामध्ये रंगीबेरंगी मासे पोहताना आढळतील.
श्री विजयपुरम
या विषयावर तज्ञ बना.