श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ (पंजाबी: ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਕੌਮਾਂਤਰੀ ਹਵਾਈ ਅੱਡਾ) (आहसंवि: ATQ, आप्रविको: VIAR) हा भारत देशातील पंजाब राज्याच्या अमृतसर शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. शिखांचे चौथे धर्मगुरू गुरू रामदास ह्यांचे नाव देण्यात आलेला हा विमानतळ अमृतसरच्या ११ किमी ईशान्येस भारत-पाकिस्तान सीमेजवळ स्थित आहे.
२५ फेब्रुवारी २००९ रोजी अमृतसर विमानतळाचा नवा टर्मिनल वाहतूकीस खुला करण्यात आला. ह्याच वर्षी येथील प्रवासीसंख्येमध्ये ६४ टक्क्यांनी वाढ झाली.
श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.