श्री अरविंद आश्रम किंवा श्री अरबिंदो आश्रम हे केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी स्थित एक आध्यात्मिक केंद्र आहे. योगी अरविंद घोष राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर इ.स. १९१० मध्ये पाँडिचेरी ऊर्फ पुदुच्चेरी येथे स्थायिक झाले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांच्या समूहातून या आश्रमाची स्थापना करण्यात आली. २४ नोव्हेंबर १९२६ रोजी, एका मोठ्या आध्यात्मिक अनुभूतीनंतर, अरविंद घोष यांनी आश्रमाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आध्यात्मिक सहकारी मीरा अल्फासा उर्फ श्री माताजींकडे सोपवली. म्हणून ही तारीख सामान्यतः आश्रमाचा स्थापना दिवस म्हणून ओळखली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्री अरविंद आश्रम
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!