श्रावणी म्हणजे हिंदू धर्मीयांचा विशेषसोहळा !
शैव पुरोहित वैष्णव पुरोहित व शिव इतर देवतांना आराध्य मानणाऱ्या लोकांचे जानवी बदलण्याचा हा दिवस होय. या दिवशी बहुधा श्रावणी पौर्णिमा असते.
तमिळ पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी अवनी नावाचा तमिळ महिना चालू असतो, म्हणून या दिवसाला तमिळ पंचांग पाळणारे लोक ‘अवनी अवित्तम’ म्हणतात. अवित्तम म्हणजे धनिष्ठा. दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो.
जर पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणांची श्रावणी असते. सामवेदी ब्राह्मणांची श्रावणी गणेश चतुर्थीला असते.श्रावणी निमित्त शैव पुरोहित एकत्र येऊन या दिवशी भगवान महादेवाची आराधना करतात .शिव पूजा शिवभिषेक शिव दीक्षा असे कार्यक्रम असतात .प्राचीन काळी या दिवशी नवीन शिष्य गुरूंच्या कडून शिव दीक्षा घेऊन गुरुगृही शिक्षणासाठी जात .तर शिक्षण पूर्ण करणाऱ्यास गृहस्थाश्रमात प्रवेशासाठी मार्गदर्शन दिले जाई .
विचार मंथनासाठी भागातील शैव पुरोहित व शैवलोक एकत्र जमत .
श्रावणी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.