शेफाली शाह

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

शेफाली शाह

शेफाली शाह उर्फ शेफाली शेट्टी (२२ मे, १९७३ - हयात) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. शेफालीने १९९५ सालच्या रंगीला ह्या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९८ सालच्या सत्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच २००७ साली प्रदर्शित झालेल्या द लास्ट इयर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी शेफालीला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. मोहब्बतें, मॉन्सून वेडिंग इत्यादी गाजलेल्या चित्रपटांमध्ये शेफालीच्या भूमिका होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →