शेंदरी किंवा केसरी, (जीवशास्त्रीय नाव :बिक्सा ओरेलाना) ही मध्य अमेरिकेतील एक झुडूपवर्गीय वनस्पती आहे. ही वनस्पती जगभरातील अनेक देशांमध्ये आढळून येते.
या वनस्पती पासून नारिंगी-लाल नैसर्गिक मसाला ॲनाट्टो मिळवला जातो. हा रंग बिया झाकणाऱ्या मेणासारख्या कंदांपासून प्राप्त केला जातो. मध्य आणि दक्षिण अमेरिका, मेक्सिको आणि कॅरिबियनमध्ये पारंपारिक पदार्थांमध्ये, जसे की कोचिनीटा पिबिल, चिकन, इत्यादींमध्ये या बियांच्या भुकटीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसेच लोणी, चीझ, मार्जरीन, आईस्क्रीम, मांस आणि मसाल्यासारख्या अनेक उत्पादनांमध्ये पिवळा किंवा नारिंगी रंग म्हणून ॲनाट्टो आणि त्याचे अर्क औद्योगिक अन्न रंग म्हणून देखील वापरले जातात. उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील काही स्थानिक लोक मूळतः लाल रंग आणि लिपस्टिक तसेच मसाला बनवण्यासाठी याच्या बियांचा वापर करत असत. या कारणास्तव, या वनस्पतीला लिपस्टिक ट्री असे देखील म्हणतात.
भारतात या वनस्पतीला कुमकुम ट्री किंवा कमील ट्री असेही म्हणतात. संस्कृतमध्ये या वनस्पतीचे नाव रक्तपुष्प असे आहे. सिंदूरच्या बियांपासून प्राप्त होणारा लाल-नारिंगी रंग भारतातील हिंदू विवाहित स्त्रिया आपल्या भांगात सिंदूर म्हणून लावतात.
भारतात या वनस्पतीची लागवड हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये केली जाते.
शेंदरी (वनस्पती)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.