शुभेंदु अधिकारी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

शुभेंदु अधिकारी

शुभेंदु अधिकारी (बांग्ला: শুভেন্দু অধিকারী; जन्म: १५ डिसेंबर १९७०) हे एक भारतीय राजकारणी व पश्चिम बंगाल राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत. २०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये शुभेंदु अधिकारी ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने २०८ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत संपादन केले. ९ मे २०२६ रोजी अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले.

१९९५ सालापासून राजकारणामध्ये सक्रिय असलेले अधिकारी २००० ते २०२० दरम्यान तृणमूल काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते. २००९ ते २०१६ दरम्यान ते तामलुक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २०२० साली अधिकारी ह्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला व पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सामर्थ्य वाढवण्याचे कार्य हाती घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ७७ जागांवर विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →