शीला दीक्षित (रोमन लिपी: Sheila Dikshit जन्म : ३१ मार्च १९३८; - २० जुलै २०१९) या भारतीय राजकारणी होत्या. भारतातील दिल्ली राज्याच्या त्या मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य होत्या.
त्या दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होत्या. तसेच कोणत्याही भारतीय राज्याच्या सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यांनी 1998 पासून 15 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. दीक्षित यांनी काँग्रेस पक्षाला दिल्लीत सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला. त्यांना आधुनिक दिल्लीचे शिल्पकार मानले जाते.
१९८४ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील कनोज लोकसभा मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.
शीला दीक्षित
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.