छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने महत्वाची घटना मानली जाते.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ रोजी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.