शिवराई हे शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेकाच्यावेळी पाडलेले तांब्याचे नाणे आहे. सन १९२० पर्यंत हे नाणे चलनात होते. ब्रिटिश राजवटीत नवीन नाणी आल्यानंतर ते हळूहळू बंद झाले. ब्रिटिशांनी सर्व शिवराया गोळा करायचा प्रयत्न केला, पण अजूनही काही शिवराया नदीतील वाळूत किंवा जमिनीत सापडतात.
हे तांब्याचे नाणे साधारण ११-१३ ग्रॅम वजनाचे असते. व्यास २ सें.मी. असतो. एका बाजूस श्री/राजा /शिव तर दुसऱ्या बाजूस छत्र /पती असे लिहिलेले असते. यास पूर्ण शिवराई असेही संबोधिले जाते.
शिवराई
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.