शिवणकाम (इंग्लिश: Sewing) दोन कापडाचे तुकडे सुई व दोऱ्याच्या साहाय्याने एकमेकांना जोडणे ही शिवणकामाची ढोबळ व्याख्या आहे. शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीस शिंपी म्हणतात.
शिवणकाम हाताने अथवा यंत्राच्या साहाय्याने करता येते. हाताने केलेल्या शिवणकामाच्या तुलनेत यंत्राचा वापर करून केलेले शिवणकाम हे कमी वेळात व अधिक सफाईदार होते म्हणून शिवणयंत्राचाच वापर केला जातो. मात्र लहान-सहान शिवणकामासाठी आजही हाताने केलेल्या शिवणकामावर भर दिला जातो. हाताने केलेल्या शिवणकामास हातशिलाई असे म्हणले जाते. हातशिलाईमधे धावदोरा हा प्रमुख टाका म्हणून वापरला जातो. शिवणकामाचे रीतसर शिक्षण घेताना सरावासाठी आधी हातशिलाई शिकवली जाते व अशा शिक्षित व्यक्तीस शिलाईयंत्राचा सराव करण्यास दिला जातो.
केवळ कपडे शिवण्याकरता नव्हे, तर चामड्याचे दोन तुकडे शिवण्याकरता देखील शिवणकाम करतात.
शिवणकाम
या विषयातील रहस्ये उलगडा.