भरतकाम हे कापड किंवा इतर पृष्ठभागावर सुई दोऱ्याने नक्षीकाम करण्याची क्रिया होय. भरतकामात चमकी, आरसे, शोभेच्या नळ्या, मणी, चमकते खडे इ.चा सुद्धा वापर होतो.
भरतकामाला कानडी भाषेमधे कसुती असे म्हणतात. हा कानडी शब्द, कई (हात) व सूत (धागा) या दोन शब्दांपासून बनलेला आहे. भरतकाम केलेल्या नक्षीला भारतामधे कशिदा असे देखील म्हणले जाते. सोन्याच्या तारा वापरूनदेखील भरतकाम करतात, त्यास ज़रदोज़ी असे म्हणले जाते. हल्ली ज़रदोज़ीसाठी नकली जर देखील वापरात आणली जाते.
भरतकाम करण्यासाठी निरनिराळे टाके वापरले जातात. त्यातील काही टाक्यांची नावे पुढीलप्रमाणे:
हेरिंगबोन टाका, बटनहोल टाका, फ्रेंच नॉट, फेदर स्टिच, गाठीचा टाका, गहू टाका, काश्मिरी टाका, कांथावर्क, कर्नाटकी कशिदा.
भरतकाम
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.