शिवगड

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शिवगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्यात हा किल्ला दडला आहे.

कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य आहे. या अभयारण्यात अपरिचित असा शिवगड किल्ला आहे. मालवण, आचरा इत्यादी तळकोकणातील बंदरांत उतरणारा माल अनेक घाटमार्गांनी सह्याद्रीच्या पठारावरील बाजारपेठांत जात असे. अशा घाटमार्गांपैकीच फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी शिवगडाची उभारणी करण्यात आली होती. राधानगरी व कळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या व जीववैविध्यतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्याला बरेच पर्यटक भेट देतात, पण अभयारण्यातच असलेला शिवगड पाहाण्यास फारसे पर्यटक फिरकत नाही.



पण आता टीम शिवगड कोल्हापूरने शिवगड संवर्धन कार्य हाती घेतले आहे व शिवगड किल्ल्यावर ती बऱ्याच मोहीमी राबवून वृक्षारोपण दिशादर्शक दुर्गमअशी वाट झाडाझुडपांनी पूर्ण बंदिस्त झालेली वाट पुन्हा पूर्वी प्रमाणे सुरळीत करून घेतली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साप करून घेतलेल्या आहेत. टीम शिवगड कोल्हापूर मूळ आत्ता शिवगड वर पर्यटक येणे वाढत चालले आहे.इतिहासाच्या पानांवर लपला गेलेला हा शिवगड टीम शिवगड ने संवर्धन करण्याचा दृढ निश्चय मनी धरला आहे. तसचे खूप मोठ्या प्रमाणात शिवगड संवर्धन कार्यासाठी दिवसेंदिवस शिवभक्त वाढत चालले आहेत.

शिवगड हा किल्ला दुहेरी तटबंदीचा असून तो चौकी वजा किल्ला आहे. तळकोकणातील बंदरांत उतरणारा माल अनेक घाटमार्गांनी सह्याद्रीच्या पठारावरील बाजारपेठांत जात असे. अशा घाटमार्गांपैकीच फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी शिवगडाची उभारणी करण्यात आली होती.



शिवगडला चार ही बाजूनी दुहेरी तटबंदी आहे. तर किल्ल्याचा दरवाजा गो मुखी प्रकारचा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →