शिंडलर्स लिस्ट

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

शिंडलर्स लिस्ट हा १९९३मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. स्टीवन स्पीलबर्गने निर्माण आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ऑस्ट्रेलियन लेखक थॉमस केनीलीच्या शिंडलर्स आर्क या कादंबरीवर आधारित आहे.

या चित्रपटाचे कथानक ऑस्कर शिंडलर या जर्मन उद्योगपतीच्या दुसऱ्या महायुद्धादरम्यानच्या जीवनावर आहे. या काळात सुरू असलेल्या ज्यूंच्या शिरकाणात शिंडलरने क्राकोवमधील १,००० पेक्षा अधिक पोलिश ज्यूंना आपल्या कारखान्यात कामे देउन मृत्यूपासून वाचवले होते.

यामध्ये लियाम नीसनने ऑस्कर शिंडलर, राल्फ फियेनेसने एसएस अधिकारी एमन गॉथ तर बेन किंग्सलेने इत्झाक स्टर्न या शिंडलरच्या चिटणिसाच्या भूमिका केल्या आहेत.

शिंडलर्स लिस्टला १२ ऑस्कर नामांकने, ७ पुरस्कार तसेच अनेक इतर पुरस्कार मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →