शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय (अवसरी, पुणे)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय (अवसरी, पुणे)

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी पुणे हे महाराष्ट्र शासनाचे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय असून त्याची स्थापना २००९ साली झाली. हे महाविद्यालय पुण्यापासून उत्तरेला ६५ कि. मी. असलेल्या नाशिक-पुणे महामार्गावर मंचर जवळ आहे. तसेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग पासून ६० किमी वर आहे. महाविद्यालय ग्रामीण भागात असले तरी ते प्रदूषण मुक्त वातावरणतात आहे . महाविद्यालयाने ५० एकरचा परिसर व्यापला आहे. महाविद्यालयात प्रशासकीय इमारत तसेच कार्यशाळा आहे. प्रत्येक विभागाला स्वतंत्र इमारतीची सोय आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना राहण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साठी स्वतंत्र वसतिगृहांची निर्मिती केलेली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीची मान्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्रच्या कार्यकक्षेयत हे विद्यालय येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →