शापित हा सामाजिक समस्या हाताळणारा मराठी चित्रपट ट्रॉयका फिल्म्स कंबाइन या चित्रपट निर्मिती संस्थेसाठी निर्माते मधुकर रूपजी, सुधा चितळे आणि विनय नेवाळकर यांनी १९८२ साली निर्माण केला.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद देशपांडे आणि राजदत्त यांनी केले असून कथालेखिका स्त्रेहलता दसनूरकर यांच्या कथेवर तो आधारित आहे. चित्रपट निर्मितीचा विशेष म्हणजे अरविंद देशपांडे यांच्या आजारपणामुळे दिग्दर्शन श्री. राजदत्त यांनी पूर्ण केले.
पटकथा ग. रा. कामत यांनी लिहिली असून संवादलेखन यशवंत रांजणकर यांचे आहे. संगीत सुधीर फडके यांनी दिले आहे.
शापित (मराठी चित्रपट)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.