शांता हुबळीकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

शांता हुबळीकर (१४ एप्रिल, १९१४:अदरगुंची, कर्नाटक - १७ जुलै, १९९२:पुणे, महाराष्ट्र) या एक मराठी/हिंदी/कानडी चित्रपट अभिनेत्री/गायिका होत्या. त्यांना उस्ताद अब्दुल करीमखाँसाहेबांकडून चार वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले. होते



शांता हुबळीकर यांचे लग्न लहानपणीच ७५ वर्षांच्या पुरुषाशी ठरत असल्याचे कळल्यावर त्या घरातून निघून गेल्या. शाळेतील मैत्रिणीच्या पतीच्या शिफारशीने त्या गदग येथील गुब्बी नाटक कंपनीमध्ये काम करू लागल्या. पुढे त्यांनी बाबूराव पेंढारकर यांच्या कोल्हापूर सिनेटोनमध्ये नोकरी केली. हुबळीकर यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित कान्होपात्रा या चित्रपटात कान्होपात्राच्या आईची भूमिका केली होती.

१९३७मध्ये त्यांनी प्रभात फिल्म कंपनीमध्ये काम सुरू केले.

त्यांनी 'माणूस'मध्ये गायलेले आता कशाला उद्याची बात हे गाणे प्रसिद्ध झाले होते. त्यांनी याच नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →