शशिकला जवळकर-सैगल ( 4 ऑगस्ट 1932 - 4 एप्रिल 2021), शशिकला नावाने ओळखल्या जाणाऱ्या, एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री होत्या. त्यांनी 1940च्या दशकापासून शेकडो बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या.
जवळकर कुटुंब मुंबईला येऊन काम शोधत होते. त्यावेळच्या लोकप्रिय गायिका नूरजहान यांना भेटून शशिकला यांनी काम मागितले. आणि नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकला यांना संधी मिळाली. नंतर व्ही. शांताराम यांच्या तीन बत्ती चार रास्तामध्ये बहुभाषक भावजयींपैकी मराठी भावजयीच्या भूमिका त्यांनी केली. १९५३ सालच्या या चित्रपटानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका मिळू लागल्या. याप्रकारच्या खलभूमिका त्यांनी आरती (१९६२), गुमराह (१९६३) आणि फूल और पत्थर (१९६६) चित्रपटांतून केल्या.
शशिकला
यामागील विज्ञान आणि इतिहास.