शशांक दिनकर पोवार (मार्च ७, इ.स. १९७६; कोल्हापूर, महाराष्ट्र - हयात) हे मराठी संगीतकार, संगीत संयोजक आहे. यांनी मराठी दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते, चित्रपटगीते , मराठी संगीत अल्बम इत्यादी माध्यमांतून संगीत दिले आहे. झी मराठीवरील कुंकू या मालिकेसाठी यांनी चाल दिलेले शीर्षकगीत विशेष गाजले. याशिवाय झी मराठीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना संगीतबद्ध केल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शशांक पोवार
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?