नामदेव धोंडो महानोर (ना.धों. महानोर नावाने प्रसिद्ध; १६ सप्टेंबर १९४२ - ३ ऑगस्ट २०२३) हे एक मराठी कवी आणि गीतकार होते. १९७८ तसेच १९९० मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. विशेषतः त्यांच्या निसर्गकवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. महानोर हे रानकवी म्हणून देखील ओळखले जातात. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजली. एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा सारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते.
१९९१ भारत सरकारने पद्मश्री हा देशातला चौथा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.
नामदेव धोंडो महानोर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.