शरीफजीराजे व शहाजीराजे हे दोघेही मालोजी राजे यांचे पुत्र होते. पीर शाह-शरीफ यांची आराधना केल्यावरून मालोजीला मुलगा झाला; त्याचे नांव शहाजी आणि पुढें दोन वर्षांनी दुसरा मुलगा झाला त्याचे नांव 'शरीफ' असे ठेवले. 'शाह' व 'शरीफ' हीं नांवे एका सिद्ध पुरुषाच्या नांवावरून ठेविली होती.
शरीफराजे भोसले:
अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे आणि शरीफजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. त्याच ठिकाणी त्यांची ४०० वर्षांपूर्वी समाधी बांधण्यात आली होती. मात्र, कालांतराने ही समाधी हरवली. शरीफजींच्या धर्मपत्नी म्हणजे देवगिरीच्या सोमवंशी यादव कुळातील यादवराजांची कन्या व सिद्धराजांच्या भगिनी दुर्गाबाईसाहेब.
शरीफजीराजे यांना दोन मुले, एक महादजी आणि २.त्रिंबकजी- यांचा मुलाचं नाव व्यंकटजी, यांना अहमदनगर भागातील जहागिरी मिळाली होती.
त्यांना ६ मुले...संभाजी, माणकोजी (खानावट घराणे) शहाजी बेळवंडी घराणे, शरीफजी, तुकोजी, बाबाजी. आज यातील भोसले वंशज वेगवेगळ्या विभागात आपले कार्य करत आहेत.
शरीफजीराजे भोसले
या विषयावर तज्ञ बना.