शम्मी कपूर (रोमन लिपी: Shammi Kapoor ;), (२१ ऑक्टोबर, इ.स. १९३१ - १४ ऑगस्ट, इ.स. २०११) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. इ.स. १९५० आणि इ.स. १९६० च्या दशकांमध्ये त्यांचे यशस्वी चित्रपट झळकले.
शम्मीचा जन्म मुंबईत झाला तेव्हा त्याचे नामकरण शमशेर राज कपूर असे झाले. त्याकाळातील नाटक तसेच सिनेमाचे प्रसिद्ध कलावंत पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांपैकी शम्मी हे दुसरे अपत्य (दुसरे दोन - राज कपूर आणि शशी कपूर). तीनही भावंडांनी आपल्या वडिलांप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत अपार यश संपादन केले.
शम्मी कपूर
थोडक्यात पण महत्त्वाचे.