शंकर सखाराम

या विषयातील रहस्ये उलगडा.

शंकर सखाराम पाटील (जन्म : इ.स. १९५१; - ऑक्टोबर २०१२) हे मराठीतले एक भाषाभ्यासक लेखक व कवी होते. मराठीच्या बोलीभाषांतील अनेक ग्रामीण शब्दांची व्युत्पत्ती आणि अर्थ त्यांनी उलगडून दाखवला आहे.

शंकर सखाराम यांनी महाविद्यालात असल्यापासून कथालेखनाला सुरुवात केली. त्यांना कोकणातील ग्रामीण कथालेखक समजले जाते. त्यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांच्या दुःखाचे वर्णन केले आहे.

शंकर सखाराम हे मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक होते. २०११ साली ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी कथा, कादंबऱ्यांसह विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन असे विपुल लेखन केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →