व.दि. कुलकर्णी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

डाॅ. वसंत दिगंबर कुलकर्णी (?-निधन : २५ आॅगस्ट २००१) हे मराठी समीक्षक व संतसाहित्याचे अभ्यासक होते. डॉ. कुलकर्णी हे मुंबई विद्यापीठात मराठी विभागप्रमुख होते. हैदराबादच्या दक्षिण भारतातील मराठी साहित्य संशोधन संस्थेतही ते काही काळ प्राध्यापक होते. लेखिका आणि प्रकाशक कविता निरगुडकर या वदिंच्या कन्या आहेत. 'हिमदंशातून पुनर्जन्म' हे त्यांचे पुस्तक आणि त्याचा इंग्रजी अनुवाद खूप गाजला.

साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या दोन साहित्यिकांना डॉ. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एक स्मृ्ति गौरव पुरस्कार देण्यात येतो. साहित्यिकांच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान करण्याची या पुरस्काराची परंपरा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →