व्ही.एन. जानकी रामचंद्रन

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

व्ही.एन. जानकी रामचंद्रन

वैकोम नारायणी जानकी, जानकी रामचंद्रन तथा जानकी एम.जी.आर. (३० नोव्हेंबर, १९२३:वैकोम, त्रावणकोर संस्थान, ब्रिटिश भारत – १९ मे, १९९६:चेन्नई,तमिळनाडू, भारत ) या एकभारतीय अभिनेत्री आणि राजकारणी होत्या. यांनी मुख्यत्वे मलयालम आणि तमिळ चित्रपटातून काम केले. आपले पती एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर जानकी २३ दिवस तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. भारताच्या इतिहासात मुख्यमंत्री झालेल्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या.

जानकी यांचा जन्म त्रावणकोरच्या कोट्टायम जिल्ह्यातील वैकोम गावात झाला. त्यांच्या कुटुंबाचे मूळ तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही प्रदेशांत होते. यांचे वडील, राजगोपाल अय्यर, तामिळनाडूतील तंजावर येथील तमिळ ब्राह्मण होते. हे संगीतकार पापनासम शिवन यांचे भाऊ होते. यांची आई नारायणी अम्मा वैकोमची होती. जानकी यांच्या आईवडीलांचे लग्न नव्हते झाले तर त्यांच्यात संबंधम नाते होते. त्यामुळे जानकी (''वैकोम नारायणी जानकी'') आणि त्यांची भावंडे आईच्या नावाने ओळखली जायची.

जानकीनेही वयाच्या १७व्या वर्षी अभिनेते गणपति भट (१९१५-७२) या ब्राह्मण गृहस्थांशी तिच्या आई-वडिलांप्रमाणेच संबंधम लग्न केले. जानकी आणि गणपती भट यांना सुरेंद्रन नावाचा मुलगा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →