विश्वनाथन शांता (११ मार्च १९२७ - १९ जानेवारी २०२१) एक भारतीय कर्करोग तज्ज्ञ आणि अद्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट, चेन्नईच्या अध्यक्षा होत्या. सर्व रुग्णांसाठी दर्जेदार आणि परवडणारे कर्करोग उपचार उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी त्या प्रसिद्ध आहे. त्यांनी कर्करोगाच्या रुग्णांची काळजी घेणे, रोगाचा अभ्यास करणे, त्याचे प्रतिबंध आणि उपचार यावर संशोधन करणे, रोगाविषयी जागरुकता पसरवणे, आणि कर्कार्बुदरोगशास्त्रच्या विविध उपविशेषतांमध्ये तज्ञ आणि शास्त्रज्ञ विकसित करणे या ध्येयासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या कामामुळे त्यांना मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, आणि पद्मविभूषण यासह अनेक पुरस्कार जिंकले आहे.
१९५५ पासून त्या अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटशी संबंधित होत्या आणि १९८० ते १९९७ दरम्यान संस्थेच्या संचालकांसह अनेक पदे त्यांनी भूषवली. त्यांनी विश्व स्वास्थ्य संस्थाच्या आरोग्य सल्लागार समितीसह आरोग्य आणि औषधांवरील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांच्या सदस्या म्हणून काम केले.
व्ही. शांता
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?