व्हिक्टोरिया (जहाज)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

व्हिक्टोरिया (जहाज)

व्हिक्टोरिया (किंवा नाओ व्हिक्टोरिया ) हे जगाला यशस्वीपणे प्रदक्षिणा करणारे पहिले जहाज होते. व्हिक्टोरिया ही पोर्तुगीज खलाशी फर्डिनांड मॅगेलनच्या आदेशानुसार मोलुकासच्या स्पॅनिश मोहिमेचा भाग होती. १० ऑगस्ट १५१९ रोजी पाच जहाजांनी ही मोहीम सुरू झाली. मात्र, मोलुकासपर्यंत केवळ दोन जहाजांनी आपले लक्ष्य गाठले. त्यानंतर, जुआन सेबॅस्टियन डी एल्कानोच्या आदेशानुसार परतीचा प्रवास पूर्ण करणारे व्हिक्टोरिया हे एकमेव जहाज होते, ज्याने जगभर प्रवास करण्यासाठी हिंद महासागर पार केला. ती ६ सप्टेंबर १५२२ रोजी स्पेनमधील सॅनलुकार डी बारामेडा ह्या शहरात परतली.



हे जहाज स्पेनमधून निघाले आणि अटलांटिक महासागर पार करून दक्षिण अमेरिकेत पोहोचले. मग ते पॅसिफिक महासागर पार करून इंडोनेशियातील विविध बेटांवर पोहोचले. पुढे, दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनला पोहोचण्यासाठी हिंद महासागरातून प्रवास केला आणि अटलांटिक महासागरातून स्पेनला परत आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →