व्हिक्टोरिया अझारेन्का

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

व्हिक्टोरिया अझारेन्का

व्हिक्टोरिया अझारेन्का (बेलारूशियन: Вікторыя Азарэнка; ३१ जुलै १९८९, मिन्स्क) ही एक बेलारूशियन टेनिसपटू आहे. अझारेन्काने आजवर दोन एकेरी (२०१२ व २०१३ ऑस्ट्रेलियन ओपन), २ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा (२००७ यू.एस. ओपन व २००८ फ्रेंच ओपन) तसेच १५ एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१२ सालची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून ती जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर पोचली.

वयाच्या चौदाव्या वर्षापासून अझारेन्का अमेरिकेमधील फीनिक्स शहराच्या स्कॉट्सडेल ह्या उपनगरात राहते. टेनिस खेळताना तोंडामधून जोरजोरात आवाज काढण्याच्या सवयीसाठी अझारेन्कावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. २०११ विंबल्डन दरम्यान अझारेन्का ९५ डेसिबल इतक्या आवाजात किंचाळत होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →