व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल

या विषयावर तज्ञ बना.

व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल

व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल (स्पॅनिश: Virginia Ruano Pascual; २१ सप्टेंबर १९७३) ही एक निवृत्त स्पॅनिश टेनिसपटू आहे. इ.स. १९९२ ते २०१० दरम्यान व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या पास्कालने दुहेरी टेनिसमध्ये प्रचंड यश मिळवले. तिने एकूण १० ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये दुहेरीमधील अजिंक्यपदे जिंकली (पाओला सुआरेझ सोबत ८ तर आना इसाबेल मेदिना गारिगेससोबत २). तसेच तिने स्पेनच्या तोमास कार्बोनेलसोबत २००१ फ्रेंच ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद देखील मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →