वेस्ट व्हर्जिनिया (इंग्लिश: West Virginia) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले वेस्ट व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३७व्या क्रमांकाचे राज्य आहे. माउंटन स्टेट ह्या टोपणनावानुसार ह्या राज्याचा सर्व भाग ॲपलेशियन पर्वतरांगांमध्ये वसला आहे.
वेस्ट व्हर्जिनियाच्या पूर्वेला मेरीलँड, आग्नेयेला व्हर्जिनिया, ईशान्येला पेनसिल्व्हेनिया, वायव्येला ओहायो व नैऋत्येला केंटकी ही राज्ये आहेत. चार्लस्टन ही वेस्ट व्हर्जिनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
खनिज द्रव्ये हा वेस्ट व्हर्जिनियाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा स्रोत आहे. कोळसा उत्पादन व कोळसा वापरून वीजनिर्मितीमध्ये वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
वेस्ट व्हर्जिनिया
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.