वेस्ट एंड थिएटर हे मुख्य प्रवाहातील व्यावसायिक थिएटर आहे जे लंडनच्या वेस्ट एंड भागामधील नाट्यगृहांचा समुह आहे. येथे मोठ्या प्रमाणात नाटकं रंगवली जातात. न्यू यॉर्क सिटीच्या ब्रॉडवे थिएटरसह, वेस्ट एंड थिएटर सामान्यतः इंग्रजी भाषिक जगात उच्च स्तरावरील व्यावसायिक थिएटरचे प्रतिनिधित्व करते. वेस्ट एंड शो पाहणे हे लंडनमधील सामान्य पर्यटन क्रियाकलाप आहे. प्रसिद्ध कलाकार, ब्रिटिश आणि आंतरराष्ट्रीय, हे येथील रंगमंचावर वारंवार दिसतात.
वेस्ट एंडमध्ये एकूण ३९ थिएटर आहेत. लंडनमधील सर्वात जुने थिएटर, मे १६६३ मध्ये उघडलेले जे थिएटर रॉयल, ड्र्युरी लेन येथे आहे. गिल्बर्ट आणि सुलिव्हन यांच्या कॉमिक ऑपेरांच्या लोकप्रिय मालिकेसाठी बांधलेले सॅवॉय थिएटर हे १८८१ मध्ये पूर्णपणे विजेने उजळले होते.
वेस्ट एंड थिएटर
या विषयावर तज्ञ बना.