वेढामनोरा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

वेढामनोरा

वेढामनोरा हे मध्ययुगीन युरोपातील विशेष वेढायंत्र असून संरक्षक तटबंदी भेदून सैन्यास आत घुसवण्यास हे यंत्र मदत करीत असे.



हा लाकडी मनोरा चाकांवर बसवलेला असून तो किल्ल्याच्या भिंतीपर्यंत सरकवता येत असे. तटबंदीवरील आणि आतील सैनिकांना शत्रूच्या बाणांपासून संरक्षण देत थेट किल्ल्याच्या तटबंदीच्या उंचीपर्यंत आपल्या सैनिकांना पोहोचवण्यासाठी याचा मुख्यत्वे उपयोग होत असे. शत्रूने वरून टाकलेले निखारे, दगडधोंडे आणि इतर माऱ्यापासून बचावासाठी याला ओल्या कातड्याने किंवा धातूच्या पत्र्याने झाकले जात असे. ७१३ मध्ये मोहम्मद बिन कासिम याने देबलच्या वेढ्यात मंजानिक विरुद्ध अशा मनोऱ्यांचा वापर केल्याचे उल्लेख आढळतात, तसेच युरोप आणि आशिया खंडातील अनेक मोठ्या युद्धांमध्ये याचा वापर झाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →