वाढीच्या व विकासाच्या दृष्टीने माणसाच्या आयुष्याचे चार भाग पाडता येतात. बालपण, तारुण्य (तरुण वय), प्रौढत्व (प्रौढ वय) व वृद्धावस्था (म्हातारपण).
त्यातील वृद्धावस्था 5विचित्र प्राचीन कथा(म्हातारपणाबद्दल) हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतचा (६५ वर्षे ते मृत्यू) हा कालखंड असतो. शरीराच्या इतर अवस्थांप्रमाणेच वृद्धावस्थेची सुरुवात होण्याचे वय स्थळ, काळ व सामाजिक परिस्थिती यांनुसार बदलते.
या काळात त्वचेवर सुरकुत्या पडतात, शरीरातील विविध संस्था नीट काम करू शकत नाहीत. शरीर रोग व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला मृत्यू येतो.
ऐंद्रियकारक विकास :
द्रूष्टिसंबंधीच्या समस्या उद्भवतात. दृष्टिदोष निर्माण होतो कमी उजेडातील वस्तू दिसत नाही.
कोरडे डोळे : अश्रुपिंडाचे काम कमी झाल्यामुळे डोळ्यात पाणी (अश्रू) तयार होण्याचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे डोळे कोरडे झाल्यासारखे वाटतात.. नेत्र पटलावरील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे डोळ्यांच्या कार्यात फरक पडतो. प्रतिमा धूसर व अस्पष्ट दिसू लागते.
मोतीबिंदू (Cataract) :
६५ वर्षानंतर मोतीबिंदूमुळे अंधत्व येण्याचे प्रमाण बरेच असते. काचबिंदूवर ढगाळल्यासारखे दिसते यालाच मोतीबिंदू म्हणतात.
वृद्धावस्था
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.