वृत्तपत्रीय वितरण

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

एखाद्या सर्वसाधारण दिवशी वृत्तपत्राच्या वितरीत होणाऱ्या प्रतींच्या संख्येस वृत्तपत्राचा खप (सर्क्यूलेशन) असे म्हणतात.. वर्तमानपत्राचा खप हा सध्या घसरला आहे. खप हा जाहीरातीचे दर ठरविणारा एक प्रमुख घटक आहे. खप हा सदैव विकल्या गेलेल्या प्रतींएवढा नसतो,ज्यास विक्रीखप असेही म्हणतात,कारण काही वृत्तपत्रे वाचकांस विनामूल्य देण्यात येतात. वाचकसंख्येचा आकडा हा वितरणाच्या आकड्यापेक्षा मोठाच असतो कारण असे समजले जाते कि,वृत्तपत्राची विशिष्ट प्रत एकापेक्षा अधिक लोकं वाचतात.

जगात वृत्तपत्र वितरणात वाढ झाली असून, २००८ सालात दररोज ५४० दशलक्ष प्रती विकल्या गेल्याचे जागतिक वृत्तपत्र संघटनेच्या अहवालात म्हणले आहे.जगात सर्वत्र मंदीचा प्रभाव असतानाही वृत्तपत्रांच्या विक्रीत १.३ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष गाविन ओ रिली यांनी सांगितले. दररोज १.९ अब्ज लोक वृत्तपत्र विकत घेऊन वाचतात. गेल्या पाच वर्षांत वृत्तपत्रांचा खप ८.८ टक्क्याने वाढला आहे.

अनेक देशात,वेगवेगळ्या संस्थांतर्फे वितरणाचे अंकेक्षण होते, जसे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन. त्याने जाहिरातदारास ही खात्री होते कि, अमुक एक वर्तमानपत्र हे खरोखरीच प्रकाशकाने दर्शविलेल्या आकड्यांपर्यंत पोचते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →