विशाळगड

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

विशाळगड

विशाळगड/खेळणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. हा किल्ला कोल्हापूर जिल्याच्या पश्चिमेकडील शाहूवाडी (www.shahuwadi.com) तालुक्यात आहे.

किल्ले विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरित्याच दुर्गमतेच कवच लाभल आहे. हा प्राचीन किल्ला अणुस्कुरा घाट व आंबा घाट, या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था उद्वीग्न करणारी आहे. इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →