पूर्णगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
रत्नागिरी् जिल्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.
मुंबई पणजी महामार्गावर हातरवांबा फाटा आहे. येथून पश्चिमेकडे रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण सागर किनाऱ्यावर वसलेले आहे. रत्नागिरी मधील प्रेक्षणीय स्थळे तसेच थिबा राजवाडा पाहून आपण पावस या धार्मिक क्षेत्राकडे निघतो. वाटेतील भाटय़े खाडीवरील पूल ओलांडल्यावर भाटय़े गाव लागते. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सेनापती मायनाक भंडारी यांचे स्मारक आहे. ते त्यांच्या वंशजांच्या घराच्या अंगणात आहे.
पावसमध्ये स्वामी स्वरूपानंदाचे स्मृतीमंदिर आहे. येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे.
गावरवडीच्या पुलाच्या अलिकडेच पूर्णगड गाव आहे.
पूर्णगड
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?